चाळीसगाव (प्रतिनिधी ) ;-येथील माहेर असलेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सौ.अश्विनी बिरारी ( वय 27 रा. अभिनव शाळेसमोर भडगाव रोड चाळीसगाव) या विवाहितेचा चाळीसगाव च्या धुळे रोड परिसरातील डेराबर्डी येथील खदानीत पाण्यात तरंगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
पोलिसांना खबर मिळाल्यानंतर पोलिस व मृताचे नातेवाईक ओळख परेड साठी पोहोचल्यानंतर तो मृतदेह हरवलेल्या अश्विनीचा असल्याचे स्पष्ट झाले. तो मृतदेह पाण्या बाहेर काढल्यानंतर कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने घटनास्थळावर पंचनामा करून शवविच्छेदन जागेवरच करण्यात येऊन मृतदेह त्याच ठिकाणी पुरण्यात आला. या महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होत नसल्याने तर्क वितर्क लावले जात आहेत. हि महिला गतीमंद असल्याची माहिती समोर अली आहे. ती ७ एप्रिल पासून घरातून निघून गेली होती. 8 एप्रिल रोजी कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. सध्या ती माहेरी वडिलांसोबत राहत होती. तिचे दोन विवाह झाले होते . पहिल्या पतीपासून झालेली पाच वर्षांची मुलगी आणि ती माहेरी राहत होती . या पार्शवभूमीवर पोलीस पुढील तपास करीत आहेत.