जळगाव ( प्रतिनिनिधी ) ;- पेट्रोल डिझेल दरवाढ ,बंद करा मोदी सरकार, पेट्रोल डिझेलच्या दरवाढ कमी झाल्याचं पाहिजे, मोदी सरकार हाय हाय ‘ अशा घोषणा देऊन जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेसतर्फे आज सकाळी गणेश कॉलनीजवळील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढविरोधात आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यभरात इंधन दर वाढविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज जळगावात हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज चौधरी, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष मनोज सोनवणे , जनरल सेक्रेटरी जमील शेख ,प्रदेश प्रतिनिधी न्यानेश्वर कोळी, सोशल मीडिया प्रमुख प्रमोद घुगे, भिकन सोनवणे ,समाधान पाटील ,प्रदीप सोनवणे ,जगदीश गाडे, दीपक सोनवणे, देवेंद्र मराठे, पी. जी. पाटील, गोकुळ चव्हाण ,राहुल गरुड, वैभव पाटील, सचिन माळी, ज्ञानेश्वर पाटील ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.