… त्यामुळे दिले कबुतर आणि मांजरांना मारण्याचे आदेश
नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ;- हुकुमशाही आणि आपल्या विचित्र आदेशांसाठी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग ओळखला जातो. संपूर्ण जगात कोरोनाचे संकट असताना किम जोंगने देशातील कबुतर आणि मांजरांना मारण्याचे आदेश दिले आहेत. देशात कबुतर आणि मांजरांमुळे कोरोनाचा फैलाव होत आहे असे किम जोंगला वाटत आहे. त्यामुळे त्याने कबुतर आणि मांजरांना मारण्याचे आदेश दिले आहेत.
चीनच्या सीमेवरून जे जे प्राणी येतील त्यांना मारण्याचे आदेश किम जोंग उनने दिले आहेत. चीनमधून येणार्या प्राण्यांमधून कोरोनाचा फैलाव होत असल्याचा दावा किम जोंग उनने केला आहे. त्यामुळे देशातील मांजर आणि कबुतरांना मारण्याचे आदेशने किमने दिले आहे. हा निर्णय अतार्किक असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली होती. एका कुटुंबाकडे मांजर असल्याने त्यांना 20 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.