मथुरा ( वृत्तसंस्था ) एका मांत्रिकाने विवाहित महिलेला तोडगा काढून देण्यासाठी रात्री बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली असून पोलीस आरोपी मांत्रिकाचा शोध घेत आहे.
मथुरा जिल्ह्यातील बरसाना गावात नरेंद्र नावाचा एक मांत्रिक त्याचा मित्र संदीप तोमर याच्यासोबत आला होता. गुरुवारी त्याने गावातील काही लोकांवर त्याच्या अघोरी उपायांचे प्रयोगही केले होते. याच वेळी गावातील एक विवाहित महिला त्याच्याकडे तिची तक्रार सांगायला आली होती. तेव्हा त्या महिलेला मांत्रिकाने सांगितले की, ‘तू रात्रीच्या वेळी भेटायला ये, त्यावेळी तुला उपाय सांगतो. असे सांगून मांत्रिकाने सांगितलेल्या ठिकाणी पीडित महिला रात्रीच्या वेळी त्याला भेटायला गेली. तेव्हा मांत्रिकने तिच्या समस्येवर उपाय करण्याऐवजी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची तक्रार पीडित महिलेने बरसाना पोलीस स्थानकात नोंदवली. तेव्हा पोलिसांनी मांत्रिक आणि त्याच्या मित्रांना अटक करण्यासाठी धाव घेतली. पण मांत्रिक त्याच्या मित्रासह पळून गेला.
पोलीस मांत्रिक नरेंद्र याचा शोध घेत आहेत तसेच पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीकरिता पाठवण्यात आले आहे. आरोपी मांत्रिक आणि त्याच्या मित्रांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती बरसाना पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आझाद सिंह पाल यांनी दिली आहे.