धानोरा ता.चोपडा ;- चोपडा तालुक्यात लोक सहभागातुन हातेड, चहार्डी, लासुर, वैजापूर, अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येकी कमीत कमी 12 बेड आॅक्सिजन सेंट्रल पाईपलाईन ने जोडण्यासाठी लोकसहभागातून लाखो रुपयांची देणगी सर्वच स्थरातील लोकांनी उपलब्ध करून देत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून दिली. त्याचप्रमाणे धानोरा आरोग्य केंद्रातही ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणी साठी सोशल मीडियावर मॅसेज टाकून वर्गणी जमा केली जात आहे.
यात धानोरा येथील माध्यमिक विद्यालयाच्या १९९५/९६च्या इयत्ता 10 वीच्या बॅचच्या माजी विद्यार्थांनी एकत्रित येऊन तीस हजार रुपयांचा (30,000) रुपये व साठ हजार किंमतीचे तिन जब्बो ऑक्सिजन सिलेंडर देखील बॅच तर्फे उपलब्ध करून देणार आहेत. त्याच्या या दातृत्वाने गावात त्यांचे कौतुक केले जात आहे.

कोरोना या महाभयंकर आजाराने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. हा आजार झाल्यावर रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासू लागते. यामुळे ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता जाणवू लागली आहे.
चोपडा तालुका कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर विळखा घातला होता. यात अनेक बाधित रुग्णांनी ऑक्सिजन न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत. ऑक्सिजनची ही समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील हातेड, चहार्डी, लासुर, वैजापूर, अडावद व धानोरा येथे
लोकसहभातुन सेंट्रल ऑक्सिजन पाईपलाईन ने जोडण्यासाठी लोकसहभागातून निधी संकलित करून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे.
बॅचचे प्रतिनिधी म्हणून चंद्रशेखर पाटील, अजित तडवी, आनंद पाटील, हिराचंद तिवारी, अमरदीप गुजर यांनी तिस हजारांचा धनादेश पोलीस पाटील दिनेश पाटील, उपसरपंच विजय चौधरी, हितेंद्र पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी आरोग्य केंद्राचे डॉ. शेख, भारती सोनवणे, प्रविण ठाकुर आदी उपस्थित होते.







