जळगाव (प्रतिनिधी) ;- महाबळ परिसरात राहणाऱ्या सावत्र पित्याने आपल्या २० वर्षीय मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला . मात्र याची तिने आजीला याबाबत सांगितले असता तिला पुण्याला पाठवून दिले. मात्र सावत्र बाप हा फोन आणि मेसेजद्वारे मुलीला सारखा त्रास देत असल्याने तिने पुण्यातील सामाजिक संस्थेची मदत घेऊन पुण्याच्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता . शहरातील रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा वर्ग झाल्याने सावत्र बापाच्या रात्री पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून पुढील चौकशी सुरु आहे.

एका परिसरात राहणाऱ्या विवाहीतेचे दुसरे लग्न केले असून तिला पहिल्या नवऱ्यापासून आता २० वर्षांची मुलगी आहे. मात्र लग्न केलेल्या दुसऱ्या बापानेच तिचा अत्याचार २०१९ पासून वेळोवेळी केला . मात्र आई आणि आजीला हा प्रकार सांगितल्यावरही त्यांनी नराधम सावत्र बापाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला . तसेच पीडित मुलीला पुण्याला पाठवून दिले. मात्र सावत्र बाप हा सतत फोन आणि मेसेजद्वारे त्रास देत असल्याने आपल्या आजी आजोबांच्या मदतीने सामाजिक संस्थेची मदत घेऊन पुणे पोलिसांत गुन्हा दाखल केला . हा गुन्हा रामानंद नगरला वर्ग करण्यात आल्याने पोलिसांनी रात्री उशिरा सावत्र नराधम पित्याला अटक केली आहे. . तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.







