चाळीसगाव ( प्रतिनिधी ) ;- कांद्याचा माल घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये बिघाड झाल्याने ड्रायव्हरने चाळीसगाव बायपास येथे ट्रक बाजूला लावून मेकॅनिक पाहण्यासाठी निघून गेल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी सुमारे १० लाखांचा ट्रक चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने याबाबत ड्रायव्हरच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, ट्रक चालक गुरूशरणसिंग बलदेवसिंग पल्ला (वय-४० रा. खडका रोड, गडकरी नगर, ता. भुसावळ)यांनी बुधवार,२ जून रोजी सकाळी ८ वाजता संतोष ट्रान्सपोर्ट मालेगाव यांच्या मार्फत चांदवड जि. नाशिक येथून कांदा वाहतूकीसाठी ट्रकची मागणी करण्यात आली. त्यावर गुरूशरणसिंग पल्ला हे बारा चाकाची ट्रक (क्र. एम.एच. १९- झेड- ४७५९) भुसावळ येथून सकाळी ८वाजेला पाचोरा-चाळीसगाव मार्गे जाण्यासाठी निघाले. दरम्यान चाळीसगाव बायपास जवळ ट्रकचा डायफ्राम लिक होऊन ब्रेकमध्ये अचानक बिघाड झाल्याने दुपारी १:३० वाजता ट्रक त्याच ठिकाणी उभी करून चालक पल्ला हे मेकॅनिक पाहण्यासाठी शहरात गेले. मात्र दुकाने बंद असल्याने मेकॅनिक न मिळाल्याने ट्रक लावलेल्या जागेवर दिसून आला नाही. याबाबत गुरूशरणसिंग पल्ला यांनी शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम- ३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.







