मुंबई (वृत्तसंस्था) – छत्रपती संभाजी राजे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेत आहेत. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी अनेकदा वेळ मागूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली नाही, अशी जाहीर नाराजी संभाजीराजे यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. त्यामुळे संभाजीराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र याबाबत आता स्वत: संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे म्हणाले, ‘मोदींवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून त्यांनी मला राज्यसभेत नेमलं आहे. हे सगळं असलं तरी एक खासदार म्हणून आमच्या भावना मांडणं चुकीचं नाही. त्यामुळं मराठा आरक्षणाबाबत मत सांगण्याचा माझा प्रयत्न राहील,’ असं ते म्हणाले.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा आरक्षण प्रश्नी सकारात्मक आहेत. त्यांनी माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याच दिवशी तसं जाहीर ही केलं आहे. अजून आठ-नऊ दिवस आहेत, असं ते म्हणाले होते. त्यामुळे चर्चेतून मार्ग निघू शकतो, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – संपूर्ण देश एका बाजूला कोरोनाशी लढत आहे तर दुसरीकडे भारतीय जवान दहशतवादाशी दोन हात करीत आहेत. काश्मीर मध्ये मोठा दहशतवादी हल्ला रोखण्याला भारतीय सैन्याला यश आले आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात स्फोटके आढळून आली आहेत. भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे मोठा दहशतवादी हल्ला होण्यापासून वाचला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भारतीय सैन्याला अवंतीपोरा येथील पजगम भागाजवळ एका बागेमध्ये आईडी सापडलं. स्फोटके आढळून येताच भारतीय सैन्यानं बॉम डिस्पोजल स्क्वाडला पाचारण केलं. त्यानंतर स्फोटकं निकामी करण्यासाठी या ठिकाणी तात्काळ दोन डिस्पोजल स्कॉड दाखल झाले. काही वेळातच या पथकांनी स्फोटकं निकामी केली. याबाबतचे वृत्त या वृत्तसंस्थेने दिले असून याबाबतचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. दरम्यान दोन आठवड्यांपूर्वी देखीले दक्षिण पुलवामा जिल्ह्यात दहा किलोची स्फोटकं जप्त करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका ट्विटमध्ये जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना हल्ले करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे भारतीय जवानांकडून अधिक सतर्कता बाळगली जात आहे.