पारोळा ;- कॉटेज हॉस्पिटल साठी प्रशासनाच्या यांच्या आवाहानानुसार ऑक्सिजन कॉन्संट्रेनतंर ,जनरेटर घेण्यासाठी मदत निधी जमा करावी या अनुषंगाने पारोळा तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून जाहिर आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनास पारोळा तालुका प्राथमिक शिक्षण विभाग अधिकारी, शिक्षक बंधू , यांनी मदत केली. जवळपास १ लाखाचा वर निधी जमा झाला.
जमा झालेल्या निधीतुन कॉटेज हॉस्पिटल साठी जनरेटर बसविण्यात येणार आहे. या निधीचा धनादेश पारोळा गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे व ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकात चौधरी यांच्याहस्ते पारोळा तहसिलदार गवांदे व वैद्यकीय अधिक्षक .योगेश सांळुखें यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अनिल चौधरी , गुणवंत पाटील, राजेंद्र बाबुराव पाटील, रविंद्र पाटिल, गिरीष वाणी,मनेश शिंदे, चंद्रशेखर देसले, प्रविण कोळी, सचिन देशमुख, देविदास सोनवणे, सचिन पाटिल, गोपाल पाटील, अनिल पाटील, दिपक गिरासे, जयप्रकाश सुर्यवंशी, सुनिल जाधव,नाना मराठे, सुभाष निळ, प्रशांत पाटिल, निलेश पाटील नगरसेवक पी जी पाटील आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार अनिल गव्हांदे यांनी प्रा शिक्षक संघटनेचे विशेष कौतुक करत मनोगत व्यक्त केले . सुत्रसंचलन अनिल चौधरी यांनी केले. आभार नगरसेवक पी जी पाटील यांनी मानले.








