• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यात सुमारे 23 लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रीची माहिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. 1 ते 7 एप्रिल 2020 या सात दिवसात राज्यातील 90 लाख 02 हजार 868 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 22 लाख 83 हजार 180 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7.00 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रती कार्ड 15 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती कार्ड 20 किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 2 रु. किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु. किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो.राज्यात या योजनेमधून सुमारे 12 लाख 52 हजार 350 क्विंटल गहू, 9 लाख 75 हजार 144 क्विंटल तांदूळ, तर 11 हजार 503 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 4 लाख 23 हजार 715 स्थलांतरित शिधापत्रिका धारकांनी ते सध्या राहत असलेल्या ठिकाणी पोर्टेबिलिटी योजनेनुसार अन्नधान्य घेतले आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त मोफत तांदूळ दि. 3 एप्रिलपासून टप्या-टप्याने देण्यात येत आहे. या योजनेसाठी 3 लाख 50 हजार 082 मे.टन तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून दिले जाणार आहे.


 

 

Previous Post

जेईई मुख्य परीक्षेच्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी

Next Post

राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी ‘महाइन्फोकोरोना’ संकेतस्थळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी 'महाइन्फोकोरोना' संकेतस्थळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी पिस्टलची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय  टोळीचा पर्दाफाश
1xbet russia

गावठी पिस्टलची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय  टोळीचा पर्दाफाश

March 7, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौरांच्या आदेशानंतर प्रशासनाची कार्यवाही : जळगाव महानगरपालिकेत मालमत्ता कराबाबत कठोर पावले !

March 7, 2026
अर्थसंकल्प विकासाभिमुख; ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ कर्जमाफी निर्णय ऐतिहासिक – गिरीश महाजन
1xbet russia

अर्थसंकल्प विकासाभिमुख; ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ कर्जमाफी निर्णय ऐतिहासिक – गिरीश महाजन

March 7, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा
1xbet russia

जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

March 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी पिस्टलची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय  टोळीचा पर्दाफाश

गावठी पिस्टलची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय  टोळीचा पर्दाफाश

March 7, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौरांच्या आदेशानंतर प्रशासनाची कार्यवाही : जळगाव महानगरपालिकेत मालमत्ता कराबाबत कठोर पावले !

March 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon