नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अभिनेत्री जरीन खान गेल्या अनेक दिवसांपासून विविध अडचणींचा सामना करत आहे. गेल्या महिनाभरापासून जरीन सोशल मीडियापासून खूप दूर होती. यामागील कारणाचा तिने नुकताच खुलासा केला आहे. दीड महिन्यांपासून जरीनची आई अतिशय आजारी आहे. यामुळे जरीन आपल्या आईच्या सेवेत व्यग्र आहे. आता जरीनच्या आईची प्रकृती स्थिर होता होता पुन्हा बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. याबाबत जरीनने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना आईसाठी प्रार्थना करण्याची विनंती करीत एक पोस्ट केली आहे.

जरीनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘मला माहितेय मला थोडा उशिर झालाय, पण माझ्या वाढदिवसाच्या आणि ईदच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मला त्यावेळी वैयक्तिकरित्या तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करणे जमले नाही. गेल्या दीड महिन्यांपासून माझी आई आजारी आहे. त्यामुळे मी तिची काळजी घेतेय. दरम्यान वारंवार रूग्णालयात जावे लागतेय. आता तिला पुन्हा रूग्णालयात भरती करावे लागले आहे. कृपा करून माझी आई लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करा,’ असे तिने तिच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे







