मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) मेंढोळदे येथे काल झालेल्या वादळात गावातील पुर्ण घरांचे नुकसान झाले. यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधून महसुल प्रशासनाने नुकसानीचे तत्काळ


सरसकट पंचनामे करावे अशी विनंती केली. यावेळीजि प माजी गटनेते विनोद तराळ , तालुका अध्यक्ष यु डी पाटील , संदिप देशमुख,माफदा तालुकाध्यक्ष रामभाऊजी पाटील, बाजार समिती संचालक कैलास पाटील, जावजी भाऊ धनगर, भैय्या पाटील, गुड्डू भाऊ पाटील,सद्दाम शेख आदी उपस्थित होते .







