मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील उचंदा येथे काल झालेल्या वादळात गावातील अनेक घरांचे नुकसान झाले. जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून महसुल प्रशासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली. यावेळी तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील, संदिप देशमुख,माणिकराव पाटील,माफदा तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, बाजार समिती संचालक कैलास पाटील, भैय्या पाटील,सद्दाम भाई शेख, किरण तायडे आदी उपस्थित होते.