अमळनेर ( प्रतिनिधी ) ;- कोरोनाचा सामना करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा भाग म्हणून मनोजालय फाउंडेशन, बहादरपूर यांच्यामार्फत मास्क वाटप करत “मास्क सेल्फी’ अभियान राबवले जात आहे. या अभियानाचा शुभारंभ अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी केला.
कोरोना काळात योगदान देणारी मनोजालय फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त करत आमदारांनी अभियानाचे कौतूक केले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मनोजालय फाउंडेशनचे अध्यक्ष विजय मिस्तरी यांनी २५ हजार मास्क वाटपाचा संकल्प केला अाहे. राज्य समन्वक प्रवीण सुतार यांनी डिस्टन्सिंगबाबत मार्गदर्शन केले व आमदारांशी मनरेगा कामांबाबत चर्चा केली. यावेळी पारोळा पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, गोपाल पाटील, गोकुळ चौधरी, सरपंच भिकन पारधी, उपसरपंच परेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वाणी, योगेश पाटील, सुनील वाणी, किरण पवार, त्र्यंबक कुलकर्णी, राजेंद्र चौधरी, निंबा भोई, प्रभाकर भोई आदी उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.