नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;-एका तरुणीवर बलात्कार करून व्हिडीओ बनवणाऱ्यांना बंगळुरू पोलिसांनी अखेर अटक केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध सुरू केला होता. या प्रकरणात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही ट्विट करत आरोपींना पकडण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, या प्रकरणी आरोपींविरुद्ध बंगळुरूतील राममूर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणीवर सामूहित अत्याचाराचा आणि अनैसर्गिक कृत्य करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ आसाम पोलिसांच्या निदर्शनास आला आहे. त्यानंतर पोलिसांनी व्हिडीओतील आरोपींची दृश्य सोशल मीडियावर शेअर करत, या घटनेबद्दल कुणालाही काही माहिती असल्याचे माहिती देण्याचे आवाहन केले होते.आसाम पोलिसांचे हे ट्विट केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही रिट्विट केले . सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांना त्यांनी आवाहन केले होते. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना मदत करावी, असे रिजिजू म्हटले होते. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरूच होता. बंगळुरू पोलिसांना आरोपींबद्दलची माहिती मिळाली. पोलिसांनी व्हिडीओत दिसणाऱ्या आरोपींसह एका महिलेला अटक केली.