नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- देशात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. गेल्या 24 तासांत १ लाख 79 हजार 5 535 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 2 लाख 64 हजार 182 रुग्ण बरे झाले आहेत, तर 3,556 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांचा आकडा मागील 54 दिवसात सर्वात कमी राहिला. यापूर्वी यापूर्वी 13 एप्रिल रोजी 1 लाख 85 हजार 306 नवीन रुग्ण आढळले होते.
28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून बरे झालेल्या नवीन रूग्णांची संख्या जास्त आहे. केवळ तामिळनाडू, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, लडाख आणि मिझोरममध्ये बरे होणाऱ्यांची संख्या नवीन रुग्णांच्या तुलनेत कमी आहे. गुरुवारी, देशात 28,323 सक्रिय रुग्ण कमी झाले. आता 23 लाख 27 हजार 541 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.