• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शरद पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी सुरक्षा वाढवली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2021
in महाराष्ट्र
0

बारामती (वृत्तसंस्था) –राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार होते. सोलापूर जिल्ह्यातील लोकं आंदोलन करणार आहेत, असं समजताच पोलिसांनी गोविंद बागेबाहेर सुरक्षा वाढवली आहे. दोन आंदोलकांना बारामतीत पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे.

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांना पाच टीएमसी पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्व स्तरातून विरोध झाल्यानंतर तो निर्णय जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी रद्द करत असल्याचे सांगितले. मात्र जयंत पाटलांनी तोंडी आश्वासन न देता आंदोलनस्थळी लेखी आश्वासन द्यावे आणि शासन दरबारी तसा अध्यादेश काढावा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

‘उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी उजनी जलाशयातून इंदापूरसाठी पाणी पळवून नेले आहे. तो निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना, भाजप आणि इतर संघटनांकडून आंदोलनं करण्यात आली होती. त्यानंतर जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला असल्याचे सांगितले’ असं प्रभाकर देशमुख म्हणाले.

इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आला होता. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केल्याने हा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द केला. गेल्या ३० वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न इंदापूर-सोलापूरच्या लोकप्रतिनिधींच्या आरोप-प्रत्यारोपामुळे आणखी चिघळला आहे. आठवड्याभरापासून दोन्ही बाजूंकडून शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे भविष्यात हा संघर्ष आणखी पेटणार असल्याचे चित्र आहे.

इंदापूर तालुक्यातील सिंचनासाठी उजनीतून मंजूर केलेल्या ५ टीएमसी योजनेचा आदेशच रद्द केला आहे. माझ्यासाठी इंदापूर आणि सोलापूर दोन्हीही समान आहेत. मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांबरोबर येणाऱ्या काळात सर्वसमावेशक चर्चा करण्यात येईल. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं दत्तात्रय भरणे म्हणाले होते.


 

 

Previous Post

हे कुणाचे टूलकिट आहेत ? उर्मिला मातोंडकर रामदेव बाबांवर संतापली

Next Post

शैक्षणिक संस्थांच्या शिक्षण शुल्काबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शैक्षणिक संस्थांच्या शिक्षण शुल्काबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon