जळगाव ;- एमआयडीसी परिसरातील म्हाडा कॉलनी येथून एकाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हाडा कॉलनी येथे राहणारे दिलीप सुकदेव पाटील (वय-४७) त्यांच्याकडे (एमएच १९ सीएस १४६०) दुचाकी आहे. १७ मे रोजी सायंकाळी कामावरून घरी आले होते. रात्री त्यांनी दुचाकी आपल्या घरासमोर पार्किंगला लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे १८ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. दिलीप पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मिलींद सोनवणे करीत आहे.








