महामार्ग क्र.६ वर फुलगांव फाट्याजवळील घटना
जळगाव ;- भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील तीन तरुण दुचाकीने जात असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तिघे तरुण जागीच ठार झाल्याची घटना महामार्ग क्र.६ वर फुलगांव फाट्याजवळ सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली असून तळवेल गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान तीन जण दुचाकीने भुसावळकडून वारणगावकडे जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. घनश्याम राजेंद्र पाटील वय २२, देवानंद सोपान पाटील वय २५, पांडुरंग सुनिल पाटील वय २३ सर्व रा.तळवेल ता.भुसावळ अशी मयताची नावे आहेत.