मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणि मृतांमध्ये वाढ होत चालली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. तरी सुद्धा अनेक मुंबईकर गाड्या घेऊन घराबाहेर पडत आहे. अशा ३,६३४ मुंबईकरांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारी मुंबई पोलिसांनी ४६४ जणांविरोधात कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर २० मार्चपासून ते आतापर्यंत ३,६३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या २,८५० जणांची बुधवारी जामीनावर सुटका करण्यात आली आहे.दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी टाळावी, प्रवास करु नये, असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. तरी सुद्धा अनेक जण विनाकारण गाड्या घेऊन घराबाहेर पडत आहे. अशांविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वारंवार विनंती करु जे लोकं ऐकणार नाहीत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते.