जळगाव (प्रतिनिधी ) ;- फुले–शाहू-आंबेडकर विचारमंच,जळगाव, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती,जळगाव, अजिंठा हौसिंग सोसायटी, जळगाव व फुले–शाहू-आंबेडकर उत्सव समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन बुद्ध जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव शहरातील विविध विचारमंच, संघटना व समित्या यांच्या पुढाकाराने दि. २५ मे २०२१ रोजीपासून ऑनलाईन बुद्ध जयंती साजरी करण्यात येणार आहे. तथागत बुद्धाचाविचारसंपूर्ण विश्वालाप्रकाशमानकरणाराविचारआहे.मानवतावादाचेसूत्रपेरणाराविचारआहे.त्यामुळेभगवान बुद्धाचाबुद्धीवाद दु:ख मुक्तव भय मुक्त करून खर्या अर्थाने सर्वकंष मानव कल्याणा सूत्र आनंद सोहळ्याने प्रदान करणारा विचार आहे.या पध्दतीची व्यापक भूमिका बुद्धजयंतीच्या आयोजना मागील आहे.
बुद्ध जयंतीच्या पूर्वसंध्येला दि. २५ मे रोजी सायंकाळी ४ वाजता औरंगाबाद येथील प्रा.डॉ. संजय मोहोड ‘तथागतांची सम्यक शिकवण आणि संगीत’ या विषयावर तथागत गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित गीतांचे सादरीकरण करणार आहेत. तर दि.२६ मे २०२१ रोजी बुद्ध जयंतीच्या दिवशी सकाळी ८ वाजता डॉ. अशोक गायकवाड यांचे ‘प्रज्ञा शील करुणेतून फुलारून येणारे मानवी जीवन आणि समजक्रांती’या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी म्हणजे २६ मे २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता पुज्य भन्ते विनय बोधीप्रिय यांचे ‘धम्माचे भारतातील व विदेशातील विद्यमान अस्तित्त्व’या विषयावरील व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे. तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांनी माणसाने आपल्या जीवनातील दु:ख नाहीसे करावे व आपल्या प्रगतीचा मार्ग आपणच निवडावा आणि आधिक आधिक डोळस व्हावे यासाठी या जयंती महोत्सवाचे आयोजन फुले- शाहू- आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. म.सु.पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. जळगाव शहरातील व महाराष्ट्रातील श्रोत्यांनी या वैचारिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.