विद्यापीठात कोविड-१९ लसीकरण समारंभाचे उदघाटन
जळगाव ;- लसीकरण झाल्या नंतर सुध्दा मास्क लावणे,सुरक्षीत अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे ह्या त्रिसुत्रीचा अवलंब केला पाहिजे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित कोविड-१९ लसीकरण समारंभाच्या उदघाटन प्रसंगी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व फिरते लसीकरण केंद्र,जिल्हा आरोग्य विभाग,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी, दैनिक वेतनिक आणि सुरक्षारक्षक यांच्यासाठी कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर लसीकरण सोमवार दि.२४ एप्रिल, २०२१ रोजी आयोजित करण्यात आले. प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्रा.मोहन पावरा, सहायक प्रशासक अधिकारी, प्रतीभा सुर्वे, प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर.भादलीकर उपस्थित होते. गुलाबराव पाटील पुढे असे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील कोविड रूग्णांची संख्या कमी करण्यात जिल्हा अधिकारी, जिल्हा शल्कचिकत्सक, सर्व आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, पोलिस यंत्रणा व नागरिकांचे या सर्वांचे सहकार्य आहे. सरकार म्हणून लसीकरणाचा तुटवडा होऊ देणार नाही. महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांना लसीकरण करण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे. प्रा.ई.वायुनंदन यांनी अध्यक्षीय समारोप करतांना सांगीतले की, महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थी,प्राध्यापक यांचे लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाकडून विद्यापीठास नेहमीच सहकार्य मिळत आहे. विद्यापीठात लसीकरण शिबिर आयोजित केल्या बद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव डॉ.भादलीकर यांनी केले. सुत्रसंचलन व आभार सुभाष पवार यांनी मानले.
लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष बडगुर, डाटा ऑपरेटर प्रदीप पाटील, आरोग्य कर्मचारी विकास धनगर, श्रीमती संगीता सांळुखे, हितेश महाजन हे उपस्थित होते. यावेळी विद्यापीठातील १६० कर्मचाऱ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला.
शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ. किशोर पवार, विद्यापीठ अभियंता आर.आय.पाटील, एस.आर.गोहिल, बी.पी.पाटील, डॉ. सोमनाथ वडनेरे, अरूण सपकाळे, राजू सोनवणे, प्रमोद चव्हाण, दीपक गावीत, चंद्रकांत इसे, बाळासाहेब पाटील, बलभिम गिरी,मयुर पाटील,पदमाकर कोठावडे, के.सी.पाटील,मनोज वराडे, मृणालिनी चव्हाण, शेखर बोरसे,इत्यादींनी परिश्रम घेतले.