जळगाव ( प्रतिनिधी ) ;- मागील सात ते आठ दिवसापासून गोल्डन हार्ट ग्रुपतर्फे अन्न सेवा अमळनेर शहरात चालू आहे . अन्न सेवा चालू असतांना गोल्डन ग्रुपचे सदस्यांना लक्षात आले की ह्या उन्हाच्या तडाख्यात गरजू लहान मुले व वृद्धांना चपलांची फार गरज आहे. ते बघता या ग्रुपच्या सदस्यांनी ग्रुपला अन्न सेवासाठी आलेल्या मदतीतून चप्पल वाटप करण्यात आल्या.एकूण 50 ते 60 लोकांना चप्पल देण्यात आल्या ग्रुपला अजून मदत आल्यास गरजू लोकांना आवश्यक ती मदत करण्यात येईल.त्याच बरोबर अन्नसेवा चालू असताना भाजी पोळी, पाव भाजी,उकळलेली अंडी,व्हेज पुलाव,खिचडी,मसाले भात, सोनपापडी असे अन्न पदार्थ देण्यात येत आहे.या उपक्रमात श्रीनाथ पाटील,सनी गायकवाड,कृष्णा बोरसे,मुशाहीद शेख,राहुल बिऱ्हाडे,आकाश सैंदाने,वरून पाटील,भावेश पाटील,सिद्धू पाटील,दुर्गेश साळुंखे,अनिकेत परदेशी,हर्षल पाटील,यश पवार,देव गोसावी,अथर्व डेरे यांनी पुढाकार घेतला आहे.तसेच श्री.विनोद भैया पाटील,सचिन बाळू पाटील, बंडू जैन, बाळू शिंदे पोलीस, चैतन्य संदांशिव, मंगेश कुलकर्णी,चेतन पाटील,हरिओम अग्रवाल,कल्पेश पाटील,निखिल पाटील,भूषण साळुंखे,लखन पंजवानी, जालू चौधरी, आकाश साळुंखे, विषाल महाजन, सागर चौधरी या दात्यांनी ग्रुप ला मदत केलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार गोल्डन हर्ट ग्रुप ने मानले आहे.








