नवी दिल्ली :- दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सागर राणाच्या झालेल्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी, ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारलाअखेर अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी राजधानीच्या सीमावर्ती भागातून सुशील कुमारला बेड्या ठोकल्या. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याची जिल्हा कोर्टात हजेरी होणार आहे. सागर राणा हत्या प्रकरणात सुशील कुमार जवळपास 18 दिवसांपासून फरार होता.