मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील तालखेड येथील गजानन ढेंगे यांचे शेतात आज हरिणाचे पिल्लास 3-4 कुत्र्यांनी पकडल्यांचे पाहून ढेंगे यांनी कुत्र्या पासून या पिल्लाची सुटका केली. परंतु हरणाचे पिल्लू हल्यात गंभीर जखमी झाले. याबाबत शिवसेना उपतालुका प्रमुख, नवनीत पाटील यांना दिली त्यांनी वन विभागाला याची माहिती देऊन जखमी पिल्लास स्वाधीन केले. यावेळी अविनाश वाढे, अकबर ठेकेदार, दिपक वाघसर, रितेश मुळतकर व वनविभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.