नेल्लोर (वृत्तसंस्था ) : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात नवीन लसीची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपटणम या छोट्याशा गावात करोनावरील आयुर्वेदिक औषधासाठी हजारोंची गर्दी असल्याचे समोर आले आहे. झटक्यात कोरोना बरा करणाऱ्या या औषधासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने याठिकाणी येत आहेत.

आनंदय्या नावाच्या वैद्याने आपले हे औषध करोनावर प्रभावी असल्याचा दावा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाला, परिणामी इथे दूरुन लोक येऊ लागले. इतकंच नाही तर शेजारच्या राज्यांमधूनही अनेक नागरिक हे औषध घेण्यासाठी येत आहेत.







