जळगाव ( प्रतिनिधी ) ;- कोरोनाचे ३१ मे पर्यंत कडक निर्बंध असतांना देखील अनेकांकडून नियमांचे उल्लंघन करून छुप्या पद्धतीने दुकान सुरु ठेऊन व्यवसाय करणाऱ्या जळगाव शहरातील ४ दुकानधारकांवर मनपाच्या पथकाने सीलची कारवाई केली आहे. यात
ललित कलेक्शन्स, अतिथी मेन्स वेअर महात्मा गांधी मार्केट , कृष्णा इलेक्ट्रिकल्स स्टोअर्स चित्रा चौक, समर एजन्सीज जयकिशन वाडी आदी ठिकाणच्या दुकानांचा समावेश आहे.