जळगाव (प्रतिनिधी) ;- जामनेर पोलीस स्टेशनला दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना एलसीबीच्या पथकाने पहूर येथून अटक केली असून त्यांच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे , अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळो यांनो जळगांव जिल्हात चोरी होणारे मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना सुचना दिलेल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचेसफौ राजेद्र पाटील, अशोक महाजन, पो.हवा.अनिल इंगळे, अनिल देशमुख, कमलाकर बागुल, रमेश चौधरी, प्रदिप पाटील, जयंत चोधरी पो.ना./दिपक चौधरी आदींचे पथक तयार करण्यात आले होते . या पथकाला जामनेर पोलोस स्टेशन गु.र.न.- १५९/२०२१ भा.द.वि. कलम-३७९,३४ या गुन्ह्यातील चोरी झालेली मोटरसायकल
सनी अशोक बाविस्कर आणि अनिकेत कडुबा चौथे वय २१ रा.पहुर-कजबे , होळी चौक पहुर ता.जामनेर, दोघे रा.पहुर-कजवे, ता.जामनेर, यांनी केल्याची माहिती मिळाल्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोघांना पुढील तपासाकरिता जामनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.