जळगाव;- खत , इंधन, कृषी उपयोगी कीटकनाशक व जीवनाश्यक औषधींची दरवाढीचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून निषेध करण्यात आला असून ही दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर कॉ. अमृत महाजन, कॉ. लक्ष्मण शिंदे, शांताराम पाटील, छोटू पाटील, किसान सभेचे नेते शिवाजी पाटील, जे. डी. ठाकरे, कालू कोळी,किशोर कनडारे, उघडू साठे, राकेश शिंदे, नागदेव सिंधी आदींच्या स्वाक्षरी आहे.