जळगाव;- जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी मुंबई येथे गृहमंत्री ना दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांना मुक्ताईनगर मतदारसंघातील गृह खात्या संबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले.
यात प्रामुख्याने कुऱ्हा काकोडा येथे नविन पोलीस स्टेशनची निर्मिती व्हावी , मुक्ताईनगर, सावदा, बोदवड या पोलिस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असुन आणखी पदे मंजुर करावी. मुक्ताईनगर येथे पोलीस स्टेशन इमारत ,उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इमारत व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांचेकरिता निवासस्थान इमारत बांधकाम करणे आणि आणि मुक्ताईनगर सावदा बोदवड येथे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी असणारे जुने जिर्ण झालेले निवासस्थाने पाडून नविन निवासस्थानांचे बांधकाम करावे या मागण्यांचा समावेश आहे.
यावर ना दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी सकारात्मकता दर्शवुन जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडून संबंधित विषयासंबंधित माहिती व प्रस्ताव मागवून घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.