जळगाव ;- मुक्ताईनगर येथील एका चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याला पुढील कार्यवाहीसाठी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, मुक्ताईनगर पो.स्टे. गु.र.नं.२२३/२०१८ भादंवि क.३७९३४ या गुन्हयांत पाहिजे असलेला आरोपी प्रदिप दिलीप भिल्ल रा. पिंप्रे आकारुत ता.मुक्ताईनगर हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार होता . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले,
जळगाव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार प्रदिप भिल्ल हा त्याचे राहते गावात आला असून शेती काम करीत आहे. त्यानुसार सफो अशोक ओंकार महाजन,पोनादिपक शांताराम पाटील, पोना नंदलाल पाटील, पोना/ प्रमोद लाडवंजारी,पोकॉ भगवान पाटील, पोकॉ सचिन प्रकाश महाजन यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन मुक्ताईनगर पो.स्टे.ला हजर केले आहे.