चाळीसगाव- येथील राष्ट्रीय शिक्षण संस्था अंतर्गत जलदान समितीमार्फत आज शासकिय महात्मा फुले आरोग्य संकुलात मान्यवरांच्या उपस्थितीत मदत निधीतून रुग्णांसाठी वॉटर कुलर व आर.ओ.सिस्टिमचे लोकार्पण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करित छोटेखानी समारंभात करण्यात आले.
यावेळी चाळीसगाव उपविभागाचे प्रांताधिकारी .लक्ष्मीकांत साताळकर,डीवायएसपी कैलास गावडे,तहसिलदार अमोल मोरे,शहर पोलिस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड,राष्ट्रीय महाविद्यालयाचे प्राचार्य एस.आर.जाधव,गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर,गटशिक्षण अधिकारी विलास भोई,तालुका कोविड नोडल अधिकारी बी.पी.बाविस्कर,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक मंदार करंबळेकर,राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संचालक मनोहरराव सुर्यवंशी,जळगाव सोसायटीचे मा.मानद चिटणीस .अजय देशमुख आदि उपस्थित होते.
जलदान समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर पवार,सचिव अभिमन्यू जाधव,उपाध्यश पारस चौधरी,कोषाध्यक्ष अजिज खाटीक,सहसचिव प्रशांत आमले सदस्य राकेश बोरसे,राहुल साळुंखे,रुमदेव चव्हाण आदि उपस्थित होते तसेच प्रा.तुषार चव्हाण,.जी.के.सानप, प्रा. मनोज शितोळे,.रविंद्र देवकर,सुधिर देवरे,.संदिप कुंटे, राजेंद्र रणदिवे,संजय महाले,ज्ञानेश्वर महाजन,विजय देशमुख,सोनल साळुंखे,.प्रविण रणदिवे,विलास पाटील,राहुल पाटील, उद्धव चव्हाण,राजेंद्र चौधरी, प्रविण वाघ आदिंनी सदर उपक्रमासाठी परिश्रम घेतले. तालुका आरोग्य अधिकारी देवराम लांडे,तालुका कोविड नोडल अधिकारी बी.पी.बाविस्कर,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक मंदार करंबळेकर,औषध नियंत्रक दिपक पाटील,राहुल पवार,ठेकेदार रमेश दुलके यांनी अनमोल सहकार्य केले. या पुर्वीही कोविडने मयत झालेल्या शिक्षक बांधवाच्या परिवारास आम्ही गृपतर्फे ७५ हजाराचा मदत निधी दिला होता व यापुढेही आमच्या जलदान समितीमार्फत आम्ही वितरण कोविडचे प्रमाण कमी होईपर्यंत सुरुच ठेवू असे राष्ट्रीयता व गुरुवर्य गृपचे ऍडमिन खाटीक यांनी सांगितले.