मुंबई (वृत्तसंस्था ) ;- भारताच्या पश्चिम किनारपट्टीला नुकताच तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे. तेवढ्यातच आता भारतीयांना दिलासा देणारी गोष्ट समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुढील तीन दिवसात २१ मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे. याशिवाय यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र तयार होईल, असा अंदाज देखील हवामान विभागनं वर्तवला आहे.