जळगाव;- केंद्रातील मोदी सरकारने खतांच्या किमती भरमसाठ वाढवून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याच काम केल आहे या विरोधात जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. व केंद्र सरकारने अन्यायकारक दरवाढ कमी न केल्यास जिल्हातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलनाचा इशारा दिला.
डीएपी, पोटॅश सह इत्यादी खतांच्या किमती साधारणता प्रति बॅग 700 ते 800 रुपयांनी वाढवल्या आहेत. पेट्रोल, डिझेल, गोडेतेल, डाळी सह इत्यादी सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारने पुन्हा अडचणी निर्माण केल्या आहेत. शेतकरी बांधवांचा येणारा खरीप हंगाम व्यवस्थित पार पडावा यासाठी अन्यायकारक अशी खतांचे दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने केली आहे.