रावेर (प्रतिनिधी) ;- राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेरच्या वतीने खतांची व पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा यासंदर्भात आज १७ रोजी नायब तहसिलदार सी.जे.पवार यांना निवेदन देऊन केंद्रसरकार चा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी रा.कॉ. तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, रा.यु.कॉ. जिल्हाकार्याध्यक्ष दिपक पाटील, रा.यु.कॉ. तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष प्रणित महाजन, रा.कॉ. तालुका सरचिटणीस वाय. डी. पाटील, अल्पसंख्याक सेल जि. उपाध्यक्ष युनूस खान, रा.यु.कॉ. रावेर उपाध्यक्ष कौशल शिंदे, कॉन्ट्रॅक्टर दिपक महाजन, कॉन्ट्रॅक्टर किरण बारी, सोनू पाटील आदी उपस्थित होते.