जळगाव;- गुगल मिटच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांना स्नेहमेळाव्याच्या निमीत्ताने ऑनलाईन आणण्याचा उपक्रम गोदावरी अभियांत्रिकी जळगावने नुकताच राबवला त्यात १२५ विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
२०१८ पासून धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणी केलेली माजी विद्यार्थी संस्था असून दर वर्षी २ वेळा यामाध्यमातून आजी माजी विदयार्थ्याच्या अडीअडचणी सोडवण्याचा उपक्रम राबवला जात आहे. याचाच एक भाग म्हणून कोविड परिस्थीतीत प्राचार्य व्ही एच पाटील यांनी ऑनलाईन स्नेहमेळाव्याची संकल्पना मांडली आणि निमंत्रण देण्यात आले. जवळपास १२५ माजी विदयार्थ्यांनी या संकल्पनेचे स्वागत करीत सहभाग नोंदवला. मेळाव्याचे स्वागत आणि प्रस्तावना संघटनेचे अध्यक्ष किशोर महाजन यांनी केले. प्रा विजयकुमार वानखेडे यांनी माजी विदयार्थी मेळाव्यावर दृष्टीक्षेप टाकला. माजी विद्यार्थी मेळाव्याचा उददेश प्रा हेमंत इंगळे हयांनी विशेष भाष्य केले. आपले अनुभव शेअर करतांना अनेक विदयार्थ्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा नविन विद्यार्थ्यांना करून देण्याची तयारी दर्शवली. वेळोवेळी तांत्रिक युगातील चालू घडामोडीबाबत सेमीनार व वर्कशॉप, व रोजगार मिळवून देणे बाबत देखिल या विद्यार्थ्यांनी तयारी दर्शवली ग्लोबल प्रॉडक्ट मॅनेजर अनिल शहा, सेज युर्निवसिटी येथे प्राध्यापक असलेल्या डॉ. शिवांगिनी सक्सेना,सॉप्टवेअर सोल्युशनमध्ये असलेले निखिल बोबडे, केपीआय टेक्नॉलॉजी हर्षल महाजन, पार्थ पटेल, अजित शर्मा, मो. जावेद विश्वजीत सिंग, पवन पाटील, मेजर फहाद रहमान, जगदीश आहोले, राजकुमार सोनटक्के, जगदिश निभोंरे, केवल राठी, किरण पाटील,हे सध्या मोठया पदावर कार्यरत असून त्यांचे अनुभव व भावना व्यक्त केल्यात. जवळपास ३ तास हा मेळावा रंगला. मेळाव्याच्या शेवटी प्राचार्य व्ही एच पाटील, विदर्यार्थ्यांच्या मोठे होण्यातच संस्थेचे मोठेपण असते पण विदयार्थ्यांनी आपल्या कर्मभुमीची फेड करण्यासाठी तयारी दर्शवली याचा आनंद असून आगामी काळात आपल्या अनुभवाचा नविन विद्यार्थ्यांना फायदा होण्याचा दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन केले जातील असे आश्वासन दिले. जुन्या आठवणींना भावनिक उजाळा देतांना भावी आयुष्यासाठी गुरूनी शुभेच्छा दिल्यात. अल्युमनी असो खजिनदार प्रा दिपक झांबरे यांनी आभार मानले.