नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक याच मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. यातच मराठा आरक्षणातील चंद्रकांत पाटील यांना काय कळत असा सवाल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला होता. यावर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्यतर देत अशोक चव्हाण यांची औकात काढली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, अशोक चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करावं ते आम्हाला सांगू नये. चव्हाणांनी ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केल्याबद्दल त्यांचे आभार. केंद्राने दाखल केलेली ही याचिका म्हणजे हवेची गार झुळूक आहे. आता राज्य सरकारने देखील ही याचिका दाखल करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.