औरंगाबाद (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या वाढत्या पार्शवभूमीवर नागरिकांना अंत्यत भयावाह परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. पण याच काळात जर तुम्ही पेशंट च्या जीवाशी खेळताय तर हे चुकीचं आहे. औरंगाबाद येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सतीश चव्हाण यांनी पीएम केअर्स वर आरोप केला. कोविड च्या परिस्थितीत पीएम केअर्स ने 150 व्हेंटिलेटर पाठवण्यात आले यातून 25 घाटी रुग्णालयात 75 इतर रुग्णालयात आणि आत्ता 50 पाठवलेत यातून घाटीतील तज्ञांनी पडताळणी केल्यास असा आवाहल समोर आला कि हे कोविड च्या icu च्या वापरण्यास योग्य नाही असे ते म्हणाले.
पेशंट च्या जीवाशी खेळणारे यंत्र तयार करणाऱ्या कंपन्या वर चौकशी कारून गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच पूर्ण अनुभव कंपनी ला नसल्यास असे यंत्र तयार करू नये तसेच भारत हा अमिरेकेसारखा श्रीमंत देश नसून रुग्णांना लसीची जास्त प्रमाणात आवश्यकता आहे. आज अशा यंत्र मुळे कित्येक रुग्णाचे जीव ही गेले असतील याची ही तपासणी करावी तसेच सात कोटी लस अमेरिकेसारख्या देशाला भारताने दिल्या शासनाला विनंती आहे कि आमच्या महाराष्ट्रतील गरीब लोकांचा विचार करावा असे ते म्हणाले.