जळगाव ( प्रतिनिधी ) ;- शहीद जवानांच्या कुटूंबियांना मदतीचा हात देणारी आर्या फौंडेशन ही संस्था गेल्या वर्षी प्रमाणेच या वेळी देखील गरजू कुटुंबाच्या मदतीसाठी सरसावली आहे.गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या बिकट संकटात अहोरात्र जीवाची पर्वा न करता, तोडक्या पैशात कोरोनाने मृत्यू झालेल्या देहाची जे सेवा करीत आहेत अशा जळगावातील शिवाजी नगर ,मेहरूण आणि नेरी नाका येथील वैकुंठधाम मधील कोरोना योध्यांना आर्या फाउंडेशनने मदतीचा हात दिला. सुमारे दोन महिने पुरेल असा एकूण १५ कुटुंबाना किराणा सामान देण्यात आला.
प्रत्येक कुटुंबातील पाच सदस्य या हिशोबाने हे सामान देण्यात आले. संजय वानखेडे(अमेरिका) मनिष शहा (कतार) या डॉ.धर्मेंद्र पाटील यांच्या इंजिनिअर बालमित्रांनी परदेशातून आर्या फौंडेशनला पाठविलेल्या मदत निधीतून हा उपक्रम राबविला जात आहे.
गेल्या वर्षी देखील आर्या फौंडेशन द्वारा दोन लक्ष रुपयांच्या निधीतून गरजू कुटुंबियांना किराणा साहित्य पुरविले गेले होते.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांचे सोबत डॉ.नरेंद्र ठाकूर,रवींद्र पाटील हजर होते तसेच कोरोना योध्ये धनराज सपकाळे,पंढरी बिऱ्हाडे, काशिनाथ बिऱ्हाडे, अजित भंगाळे, महेंद्र बाविस्कर, सीताराम बिऱ्हाडे,राजेंद्र कोल्हे,महेंद्र पाटील कृष्णा शिरसाठ, सुनील बिऱ्हाडे, किशोर महाजन,लक्ष्मण हातागाडे,अशोक चौधरी आदी उपस्थित होते. या पुढेही वंचित कुटुंबियांना मदत केली जाईल असे संस्थेचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले.