• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने दाणादाण, रब्बी पिकांचे मोठे नुकसान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2020
in महाराष्ट्र
0

बीड (वृत्तसंथा) – जिल्ह्यात रविवारी दुपारपासूनच बीड, धारूर, परळी, केज, पाटोदा, वडवणी, माजलगावसह अन्य तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटात जोरदार अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतामधील पिकांसह आंब्याचा मोहर गळून मोठे नुकसान झाले. धारूर तालुक्यातील चोरांबा येथे शनिवारी रात्री वीज पडून वैजनाथ मारुती चव्हाण यांच्या शेतातील चाऱ्याची गंजी जळून खाक झाली, तर वडवणी तालुक्यातील डोंगरे वस्ती, चिंचवण येेथे अंगावर वीज पडल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. शहरामध्ये रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अवकाळी पावसाला तुरळक सुरुवात झाली. दरम्यान, साडेतीन ते चारच्या दरम्यान २० मिनिटे जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील रविवारी भरणारा आठवडी बाजारात नागरिकांची पळापळ झाली, तर शेतकरी-विक्रेत्यांची मोठी गैरसोय झाली. महात्मा फुले भाजी मंडई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये अवकाळी पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला पाण्यात बुडाला. पावसापासून बचावासाठी काही शेतकरी भाजी विक्रेत्यांनी सारवासारव करण्यासाठी तारांबळ उडाली. शहरातील अनेक ठिकाणी नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे त्रेधातिरपीट उडाली.
सिरसाळा – वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाला रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास सिरसाळ्यासह परिसरात सुरुवात झाली. जवळपास ३५ मिनिटे दमदार पाऊस झाला. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना गेल्या दोन-तीन दिवसांपासून पहाटेच्या वेळेला गारठा जाणवत आहे. तर दिवसा उकाड्यात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आकाशात ढग जमले आणि वादळी वारा सुरू झाला. यात आंब्याचा मोहर गळाला असून गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांवर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांच्या काळजीत वाढ झाली. वीट उत्पादकांनाही याचा फटका बसला. पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वांची त्रेधातिरपीट उडाली. धारूर- शहर व परिसरात शनिवारी रात्री व रविवारी दुपारी आणि सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे काढणीस आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा, मक्यासह आदी रब्बी पिके भुईसपाट झाले आहेत, तर आंब्यांचा मोहर गळून पडला आहे. शनिवारी रात्री चोरांबा येथे वीज पडून वैजनाथ मारुती चव्हाण यांच्या शेतातील चाऱ्याची गंजी जळून खाक झाली आहे.
गेवराई- तालुक्यातील कोळगावसह परिसरात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. या वेळी कोळगाव येथील दत्त मंदिराच्या शिखरावर वीज कोसळली. त्यामुळे शिखराला तडे गेले आहेत. मात्र, यात कुठलीही जिवितहानी झाली नाही, अशी माहिती कोळगाव येथील बबन महाराज लोंढे, जयदत्त बनसोडे यांनी दिली आहे.


 

 

Previous Post

इटलीमध्ये 85 भारतीय विद्यार्थी डॉक्टरांच्या निगरानीत

Next Post

आज देशभरात ८२१ रेल्वे रद्द करण्यात आल्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आज देशभरात ८२१ रेल्वे रद्द करण्यात आल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक
1xbet russia

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात गॅरेज फोडून बुलेट मोटारसायकलचे सुटे भाग लंपास

July 23, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

July 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon