पुणे :- संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येऊन ती अपुरी पडत असल्याचं गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तसेच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असल्याचं बोलून दाखवलं होतं. पण पुणे जिल्ह्यात लहान बाळांना मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होत असल्याचं भयावह चित्र पाहायला मिळत आहे.