नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना संकट आणि लॉकडाऊन यावर लोकसभा आणि राज्यसभेच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. ज्या पक्षांचे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पाच पेक्षा जास्त खासदार आहेत अशा पक्षांच्या प्रतिनिधीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी निरनिराळ्या क्षेत्रातील अग्रगण्य लोकांशी बातचित करत आहेत. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी सांगितले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय पक्षांच्या नेत्यांशी कोरोना विषाणूच्या समस्येवर चर्चा करतील. संसदेत पाच हून अधिक खासदार असलेल्या पक्षांसाठी पंतप्रधान आपल्या मजल्यावरील नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील. आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी सूचना देण्याची शक्यता आहे. तसेच, सरकारकडून कोणती पावले उचलली जाणार याविषयीही चर्चा होऊ शकते. यासोबतच पंतप्रधानांच्या गरीब कल्याण योजनेवर चर्चा होऊ शकते. लॉकडाउन वर मंथन देखील होऊ शकते. 4789 भारतात कोरोनाचे रुग्ण – आतापर्यंत देशात कोरोना रूग्णांची संख्या 4 हजार 789 झाली आहे. तर मृतांची संख्या 124 वर पोहोचली आहे. तर कोरोनावर मात करुन 353 रुग्ण घरी परत आले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 1011 कोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर एखट्या महाराष्ट्रात 64 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत रूग्णांची संख्या 642 झाली आहे. तर 40 जणांचा मत्यू झाला आहे.