औरंगाबाद (वृत्तसंस्था) – विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद येथील मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. रविंद्र शिंदे म्हणाले की या लॉकडाऊन मध्ये ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या पूर्णवेळ सर्वजण घरातच असल्यामुळे व ऑनलाइन शिक्षणामुळ विध्यार्थी मोबाईलचा अतिवापर करीत आहे.
त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक व मानसिक परिणाम होतांना दिसत आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोणातून विचार केला तर मुलांमध्ये चिडचिडेपणा व स्वमग्नता वाढत चालली आहे. ते बोलत नाही. तासंतास मोबाईल वर असतात. त्या सवयीला डिस्प्ले (Display disease) असे ही म्हणतात त्यामुळे त्यांना आजार लागू शकतात. मुलांचे डोळे या मुळे (dry) होऊ शकतात, व ते शौचाला किवा लघवी ला पण जायला कंटाळा करतात. तासंतास पाणी पीत नाही. त्यामुळे किडनीचे आजार होऊ शकतात.
सोशल मीडिया मुळे मुलं वाईट वळणाला जातात. सोशल मीडिया हे एक व्यसन आहे. त्यामुळे प्रेम प्रकरण वाढतात, व त्यात काही वाद झाले की मुलं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात, असे वाईट विचार त्यांच्या मनात/डोक्यात येतात आणि त्यावेळी झालेल्या भांडणामुळे मुलं एवढे टोकाचे पाऊल उचलतात. ते मुलं मागचा काहीही विचार न करता आपलं जीवन संपवण्याचा विचार करतात आणि काही लोक गरीब रस्त्यावर भीक मागून जगतात. किंवा काही छोट-मोठ काम करून मोठ्या कष्टाने जगतात पण त्यांच्या मनात जीवन संपवण्याचे विचार मात्र येत नाही. पण ज्या मुलांना सर्वकाही सुखसोई उपलब्ध असतात, त्यांच्याच मनात असले आत्महत्येचे विचार येतात.
आई-वडिल रागावले की आत्महत्या, काही वस्तू घेऊन न दिल्याने आत्महत्या, मुलांमध्ये सहनशीलतेचे प्रमाण कमी होत आहे. सकारात्मक विचार करणे बंद झाले आहे. हे सर्वसोशल मीडियाच्या अतिवापर केल्यामुळे मुलांच्या डोक्यात येतं. बहुदा मुलं एकटे-एकटे/स्वमग्न असतात, कोणाशी बोलत नाही संवाद साधत नाही. त्यावेळी पालकांनी त्यांना बोलत केलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे काही त्रास आहे का? काही झालंय का? तू एवढा शांत आहेस, असे म्हणून त्यांना धीर द्यावा म्हणजे मुलं काही गोष्टी लपवत नाही व त्यांच्या मनात आत्महत्या वगैरे चे विचार येणार नाही. पालकांनी त्यांच्यावर जास्त दडपण टाकू नये आणि त्यांच्याशी मित्र-मैत्रिणी सारखा संवाद साधला की ते सुद्धा तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलतील. तेव्हा मुलांच्या डोक्यात असे विचार येणार नाहीत. आणि मुलांना आता नवीन गाडी, नवीनअँडरॉड फोन, नवीन कपडे , गॉगल इत्यादीचे आकर्षण झालय. मित्र-मैत्रिणी कडे बघून आले की त्यांना तेच हवंय, काही घरातील परिस्थिती खूप वाईट असते. महागड्या वस्तू घेऊन दयायला पालकांना परवडत नाही. तर मुलांमध्ये परिस्थितीची जाणीव नाही राहिली, घरची परिस्थिती समजून न घेता ते आत्महत्या हा मार्ग निवडतात. ह्या गोष्टींमुळे सुद्धा हे सर्व वाढत आहे. आणि काही गोष्टीत पालकांनी मुलांवर त्यांच्या इच्छा लादू नयेत. जसे की शिक्षणाच्या बाबतीत त्यांना जे हवंय तेच करू द्यावे. त्यांच्या इच्छे प्रमाणे त्याचं शिक्षण झालं की त्यात त्यांना यश संपादन होते.