नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – चांदवड उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर दोन संशयित व्यक्ती रेमडीसीविर नावाच्या इंजेक्शन नावाखाली काहीतरी विकत असल्याची चर्चा चांदवड शहरात होती. चांदवडचे शिवसेना शहरप्रमुख संदीपभाऊ उगले, ब्लु पँथराचे पांडुरंग भडांगे या सामाजिक कार्यकर्ते यांनी लक्ष ठेऊन तात्काळ पोलीस स्टेशनला कळविले व संशयित किरण साळवे (रा. मनमाड) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचा दुसरा जोडीदार रोहित घरटे (रा कल्याण) हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
किरण साळवे यास चांदवड न्यायालयात हजर केले असता 10 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सणस करीत आहेत.