पाचोरा;- शहरातील बाहेरपूरा भागातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील नगरपरिषदेच्या दवाखान्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरणास शनिवारी सकाळी ९ वाजता सुरुवात झाली असून या लसीकरण केंद्राचे उद्घाटन पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, नगरसेवक वासुदेव महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल गवळी, आरोग्य सेविका भारती पाटील, जे. पी. वाडेकर, वनिता जाधव, दिपा भावसार, बी. एस. ढोले, आकाश ठाकूर, पंकज पाटील, शिवाजी पाटील व मोठ्या संख्येने आशा स्वयंम सेविका उपस्थित होत्या. १८ ते ४४ वयोगटातील ज्या नागरीकांनी ऑनलाईन नोंदणीस केली होती. त्यांना लस देण्यात आली. पाचोरा शहरासाठी ४०० कोव्हक्सिन डोस सायंकाळी पाच वाजेपर्यंत देण्यात येणार आहेत. लस घेण्यासाठी नागरीकांना पहाटे पाच वाजल्यापासून रांगा लागल्या होत्या.
पाचोरा तालुक्यातील लोहटार प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी २०० व शनिवारी २०० याप्रमाणे १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांना लसीकरण करण्यात आले. गेल्या पाच दिवसांपूर्वी तालुक्यात ८०० डोस १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांसाठी उपलब्ध झाले होते. तर वरखेडी, नांद्रा, नगरदेवळा, लोहटार व लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी ४५० डोस ४५ वयोगटातील नागरीकांसाठी उपलब्ध झाले होते. पुन्हा शनिवारी प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी १०० डोस उपलब्ध होणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. पाचोरा येथील पंचायत समितीच्या सभापती क्वाटर परीसरात ग्रामिण रुग्णालयाचे लसीकरणास सुरु असल्याने या ठिकाणी आमदार किशोर पाटील यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.