महापालिकेच्या सलग कारवाईमुळेही व्यावसायिक जुमेना
जळगाव ( प्रतिनिधी ) ;-महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज सकाळी कोरोना नियमांचे उल्लंघन करून चोरून लपून व्यवसाय सुरु ठेवणाऱ्या १८ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून दुकाने ‘सील’ केली आहेत. मनपा महानगरपालिकांचे उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हि कारवाई केली .
यात नॅशनल प्लास्टिक स्टोअर्स ,राजस्थान वेल्डिंग, श्रीराज ऑटो , सॅनोरिटा इलेक्ट्रिकल्स, महाराष्ट्र पेंटल हाऊस , वेद प्रिंटर्स ऑफसेट, शाह इंजिनिअरिंग, सुनील अर्जुन पाटील, अनंत हेअर आर्टस्, आकाश शूज सेंटर , ओमसाई मेन्स वेअर , पुष्प कलेक्शन , जगदीश होजिअरी, मेट्रो ड्रेसेस , राधिका ड्रेसेस , दीपक प्लाय व किचन, तिसरा प्रहार प्रेस , विशाल युनिफॉर्म आदींचा यात समावेश आहे .