जळगाव ;- तालुक्यातील जळगाव खुर्द ग्रा.प मध्ये डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयातील तिन विदयार्थी संदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्यानंतर गावातील नागरिकांच्या आरोग्य समस्या सोडवण्याचा धडाकाच लावला आहे. आरोग्य वर्धीनी उपकेंद्रास दोन बेड व व्हीलचेअर सप्रेम भेट देउन यात भर घातली आहे.
गेल्या तिन महीन्यापासून आरोग्य विषयक समस्या सरपंच विलास पाटील, उपसरपंच दिनेश पाटील व माजी सरपंच दिपक पाटील आणि गोदावरी फॉउंडेशनचे माजी अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार वार्ड क्र ४ मधील गटारी साफ करून पाईप भेट देत साफसफाई करून घेतली तसेच गावात घराघरात जाउन ऑक्सीजन लेव्हन व इतर तपासणी करून कोरोना जनजागृती केल्यानंतर आपल्या दातृत्वाची झलक देत आरोग्य वर्धीनी उपकेंद्रास दोन बेड व एक व्हीलचेअर देउन प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामूळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आज उपकेंद्रात माजी उपसरपंच दिपक पाटील, उपसरपंच दिनेश पाटील ग्रामस्थ गोलू पाटील, सुरेश कोळी इ मान्यवरांची उपस्थीती होती. या प्रकल्पाला साहीत्य भेट देण्यासाठी डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड तसेच गोदावरी नर्सिंगचे प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांनी विशेष प्रयत्न केले.








