नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याची टीका सुरू केली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हंटले की,’यांना काहीच झेपत नाही, जमत नाही, कळत नाही, फक्त फुकाची बडबड, तोंडाची वाफ. काय कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभलाय महाराष्ट्राला…,’ असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
याशिवाय, दुसऱ्या ट्विटमध्ये ‘प्रत्येक गोष्ट पंतप्रधान मोदींवर ढकलायची असेल तर तुम्ही घरी बसून खुर्ची कशाला उबवताय मुख्यमंत्री महोदय? तोंड काळे करा आणि बसा घरी निवांत, कडी लावून,’ असेही अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.







