नवी दिल्ली ;- कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. अशात राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते.

उत्तर प्रदेशातील मोठे नेते असणाऱ्या अजित सिंह यांची फुफ्फुसांचा संसर्ग झाल्याने प्रकृती ढासळली होती. यानंतर त्यांना गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान २० एप्रिल रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारादम्यान त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजित सिंह यांच्या मुलाने ट्विट करत निधनाची माहिती दिली आहे. जयंत चौधरी यांनी ट्वटिरला सोबत एक पोस्टदेखील शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, २० एप्रिलला अजित सिंह यांना कोरोनाची लागण झाली होती. शेवटच्या श्वासापर्यंत ते करोनाशी लढले आणि ६ मे रोजी शेवटचा श्वास घएतला. आपल्या संपूर्ण आयुष्यात अजित सिंह यांनी खूप प्रेम आणि सन्मान मिळवला.







