पारोळा (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश विभागा तर्फे आयोजित स्पर्धेत एन.ई.एस. हायस्कुल येथील शिक्षिका निता योगेश नावरकर यांना प्रशिस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय पुस्तक दिना निमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश विभागा तर्फे आयोजित पुस्तक विश्लेषण ऑडिओ स्पर्धेत आपल्या आवडीच्या पुस्तकाचे विश्लेषणात्मक वैशिष्ट्य स्व :ताच्या आवाजात रेकॉर्ड करून पाठवत त्यात यश प्राप्त केले असुन त्यांना संस्थेचे राष्ट्रीय कार्यध्याक्ष शरद गोरे, मुंबई प्रदेशअध्यक्षा हिरकणी राजश्री बोहरा, साहित्यिका राजश्री भावार्थी यांनी उत्तेजनार्थ प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आल्याने त्यांचे एन.ई.एस. हायस्कुलचे अध्यक्ष वसंतराव मोरे, संचालक मिलिंद मिसर, अशोक वाणी, पुंडलिक नावरकर, मुख्याध्यापक पी. के. सोंजे, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी मराठे, दर्पण समुह अध्यक्ष विजय नावरकर, सामाजिक कार्यकर्त्य हेमकांत मुसळे, एम.आर. वाणी यांच्या सह सर्वत्र अभिनंदन होत आहे








